MP Dr. Amol Kolhe : शिरूर मतदार संघात महायुतीत उमेदवाराला पक्ष आणि पक्षाला उमेदवार भेटत नाही

इंडिया जोडो आघाडीने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे अबकी बार चारशे पार असा खोटा आव आणून भाजप त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोधर्य वाढवण्याचे काम करत आहे.
MP Dr. AMol Kolhe
MP Dr. AMol KolheSakal

हडपसर - इंडिया जोडो आघाडीने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे अबकी बार चारशे पार असा खोटा आव आणून भाजप त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोधर्य वाढवण्याचे काम करत आहे. दक्षिण भारतात भाजपला फारशी संधी नाही. तीच गत महाराष्ट्रात आहे.

त्यामुळे महायुतीत मोठी अस्वस्थता आहे. शिरूर मतदार संघात महायुतीत उमेदवाराला पक्ष आणि पक्षाला उमेदवार भेटत नाही. यावरून ओळखून जावून आघाडीतील कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

शिरूर लोकसभा निवडणूकीसाठी इंडिया विकास आघाडीची पहिली नियोजन बैठक हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयात झाली. त्यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे (उठाबा गट) शहराध्यक्ष संजय मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष विठ्ठल सातव, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, महादेव बाबर, माजी उपमहापौर निलेश मगर, काँग्रेसचे मतदारसंघाचे निरिक्षक गोपाळ तिवारी, हडपसर मतदार संघाचे अध्यक्ष प्रवीण तुपे, दिलीप तुपे, विजय देशमुख, महेंद्र बनकर, प्रशांत सुरसे, शोएब इनामदार, संगीता ठोसर, रत्नप्रभा जगताप, विद्या होडे, नितीन आरू आदी यावेळी उपस्थित होते.

संजय मोरे म्हणाले, 'गद्दारांची गद्दारी लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे. नुसते नावात शिवाजी असून चालत नाही तर महाराज मनातून आत्मसात करावे लागतात, असा टोला आढळराव पाटील यांना लगावला. तर चेतन तुपेंचे नाव न घेता विद्यमान आमदारांनाही धडा शिकवण्याचा निर्धार आज करू.'

अरविंद शिंदे म्हणाले, 'रामाचं झालं आता कामाचं सांगा हे सत्ताधाऱ्यांना मतदारांनी विचारण्याची वेळ आहे. प्रचाराची दिशा ठरवावी लागेल. आघाडीतील प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे.'

महादेव बाबर म्हणाले, 'मागे केलेली चूक आता होणार नाही. हडपसर मध्ये ५५ हजाराचे लीड मिळवून देऊ. आमदार एकटेच गेले कार्यकर्ते मोठ्या साहेबांबरोबर आहे.'

बाळासाहेब शिवरकर म्हणाले, 'विचारांची व निष्ठेची बांधिलकी ठेवून बैठक आयोजित केली आहे. मागील निवडणुकीची खंत आम्ही मताधिक्य देऊन निश्चितपणे भरून काढू.'

संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com