Election Results : विजयाचे श्रेय जनतेला - कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,’’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

मंचर - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,’’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

डॉ. कोल्हे यांनी बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांना 
भेट दिली, त्या वेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

निवडणुकीदरम्यान झालेल्या टीकेबाबत कोल्हे म्हणाले, ‘जातीपातीच्या राजकारणाला आजचा तरुण जुमानत नाही, हेच या विजयातून सिद्ध झाले आहे. जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आणि मला निवडून दिले. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मार्गदर्शन, दिलीप वळसे पाटील व अजित पवार यांचे नियोजन महत्त्वाचे ठरले. 

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचीही मोठी मदत झाली. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका जनतेने पाहिली, त्यामुळे सर्व श्रेय जनतेलाच आहे, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirur Loksabha Election Results Amol Kolhe Win Credit Public Politics