

Pune Police Recover 250 Kg Cannabis in Shirur Seize Mahindra XUV and Mobiles Worth Rs 1 51 Crore Two Suspects Detained
esakal
लोणी काळभोर : पोलिसांनी थांबविण्याचा इशारा करूनही भरधाव वेगाने सोलापूरच्या दिशेने पळ काढणाऱ्या संशयित महिंद्रा एक्सयूव्ही कारचा पाठलाग करून अमली पदार्थ विरोधी पथकाने शिरूर येथे मोठी कारवाई केली. या कारमध्ये तब्बल २५० किलो गांजा आढळून आला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, गांजा, कार आणि मोबाईल असा एकूण एक कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.