Pune Rains : शिरूर तालुक्यात ओढ्यानाल्यांना पूर; शेतकरी वर्ग सुखावला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

पुणे : शिरूर तालुक्यात ओढ्या नाल्यांना पूर आला असून शेतकरी वर्ग सुखावला आहे. सर्वत्र परतीचा जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात देखील पाऊस मोठ्या प्रमाणात बसला आहे. 

पुणे : शिरूर तालुक्यात ओढ्या नाल्यांना पूर आला असून शेतकरी वर्ग सुखावला आहे. सर्वत्र परतीचा जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात देखील पाऊस मोठ्या प्रमाणात बसला आहे. 

शिरूर तालुक्यातील काही गावातील ओढे नाल्यांना यामुळे पूर आला आहे. शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार आणि पिंपळे खालसा या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहू लागले आहे.त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून वाट काढत वाहने बाहेर काढवे लागत आहे. शिरूर तालुक्यात सर्वदूर पाऊस बरसल्याने शेतकरीवर्ग देखील समाधान व्यक्त केले जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirur taluka in canal flood due to rain