शिरूरच्या पश्चिम भागात कोरोना परसतोय; वैद्यकिय अधिकाऱ्यांनी केले आवाहन

युनूस तांबोळी
Thursday, 6 August 2020

पिंपरखेड ( ता. शिरूर ) येथील एक महिला कोरोना पॅाझिटिव्ह रूग्ण सापडल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान या महिलेच्या पतीचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डॅा. प्रदिप बिक्कड यांनी दिली. दरम्यान या भागात गाव बंद ठेवण्यात आले असून फक्त दवाखाने व मेडीकल दुकान सुरू असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. 

टाकळी हाजी : ''शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात वारंवार कोरोना पॅाझिटिव्ह असणारे रूग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी घाबरू नये, मास्कचा वापर करा. कोणालाही त्रास जाणवू लागल्यास त्वरीत आरोग्य केंद्राला माहिती द्या, ''असे आवाहन शिरूर तालुका वैद्यकिय अधिकारी डॅा. राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जांबूत ( ता. शिरूर ) मागील आठवड्यात भाजीविक्रेता कोरोना पॅाझिटिव्ह आला होता. या बाधित व्यक्तीच्या संपर्कात 13 व्यक्ती आले होते. त्यापैकी 12 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून भाजी विक्रेत्याचा मोठा मुलगा पॅाझिटिव्ह आल्याने या गावात रूग्ण संख्या दोन झाली. संबधीताना उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. 

पिंपरखेड ( ता. शिरूर ) येथील एक महिला कोरोना पॅाझिटिव्ह रूग्ण सापडल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान या महिलेच्या पतीचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप बिक्कड यांनी दिली. दरम्यान या भागात गाव बंद ठेवण्यात आले असून फक्त दवाखाने व मेडीकल दुकान सुरू असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. 

हॉटेल-मॉल सुरू झाल्यानंतर शहरात कसं होतं वातावरण? वाचा सविस्तर

कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील आईचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. उपचारासाठी सोबत असणारा मुलगा कोरोना पॅाझिटिव्ह सापडला आहे. त्याला शिरूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंत्यसंस्कारा दरम्यान संपर्कात येणारे 24 जण होमक्वॉरन्टाईन आले आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांसाठी मलठण ( ता. शिरूर ) येथील ग्रामीण रूग्णालय हे कोविड सेंटर म्हणून सुरू करण्यात आले आहेत. तेथे या रूग्णांना पाठविण्यात येणार असल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राजेश कट्टीमनी यांनी दिली. कवठे येमाई गाव सात दिवसांसाठी बंद करण्यात आले असल्याची माहिती कामगार तलाठी सरफराश देशमुख यांनी दिली.  

Breaking : अखेर 'टीईटी'चा निकाल जाहीर; 'इतके' शिक्षक ठरले पात्र

''कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता नागरिकांनी गावामध्ये फिरू नये. पुणे विभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार सात दिवस गाव बंद ठेवण्यात आले आहे. गावात फिरकणाऱ्यांवर ग्रामपंचायतीला कारवाई करण्याचे आदेश मिळाले असून मास्क वापरा'', सामाजिक अंतर ठेवून सॅटाईझर्सचा वापर करण्याचे आवाहन पंचायत समिती सदस्य डाॅ. सुभाष पोकळे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirur taluka medical officer appealed to inform immediately to the health center