शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात अवैद्य धंदे जोरात

युनूस तांबोळी
गुरुवार, 3 मे 2018

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात अवैद्य धंदे जोरात असून, पोलिस कारवाई होत नसल्याने हे धंदे जोरात सुरू असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. पोलिस कर्मचारी वाढविण्याची मागणी होत आहे.

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात अवैद्य धंदे जोरात असून, पोलिस कारवाई होत नसल्याने हे धंदे जोरात सुरू असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. पोलिस कर्मचारी वाढविण्याची मागणी होत आहे.

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात टाकळी हाजी हे एकमेव पोलिस चौकी आहे. या चौकीच्या माध्यमातून कवठे येमाई व टाकळी हाजी जिल्हा परीषद गटात पोलिस विभागाचे काम पाहिले जाते. त्या बरोबर मोराची चिंचोली, शास्ताबाद हा परीसर या चौकी अंतर्गत येतो. मोठ्या प्रमाणात असणाऱ्या लोकसंख्येची गावे या परीसरात आहेत. असे असताना या ठिकाणी दोन पोलिस हवालदार नियुक्त करण्यात आले आहेत. त्यातून एक हवलदार शिरूर पोलिस स्टेशनला ठाणे अमंलदार म्हणून काम पाहतात. त्यामुळे येथे एकच पोलिस कर्मचारी या परीसरावर देखरेख ठेवून आहे. प्रत्येक गावामध्ये तिन ते चार संख्येत ढाबे सुरू आहेत. हॅाटेल या नावाखाली सुरू असणारे ढाब्यांमध्ये राजरोसपणे दारूची विक्री होताना दिसते. यात्रा हंगाम संपला असला तरी देखील सध्या लग्न हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे वरातीसाठी या ढाब्यांवर चांगलीच गर्दी पहावयास मिळते. टाकळी हाजी पोलिस चौकीला कमी कर्मचारीच्या नावाखाली कारवाई होत नाही. या परीसरात मोठ्या जुगारी व्यवसाय सुरू आहेत. प्रत्येक गावात लपून, काटवनात असे व्यवसाय सुरू आहेत. सध्या गावागावात पोलिस पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे गावात चालणाऱ्या अवैद्य धंद्याची माहिती पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ मिळते. असे असूनही या भागात पोलिस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मोठ्या साहेबालाच हप्ता जातोय मग काय सुरू च राहणार की...अशी चर्चा सध्या ग्रामस्थ करू लागले आहेत.

हजारो रूपयात मांडवली...
नुकत्याच कुलदैवतांच्या यात्रा मोठ्या उत्साहात पार पडल्या. काही गावात यात्रांना पोलिस बंदोबस्त देखील नाकारण्यात आला होता. यात्राच्या काळात या परीसरात मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे सुरू होते. त्यातून रात्रीच्या दिखावू कारवाया झाल्या असून, हजारो रूपयांत मांडवली झाल्याची चर्चा या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात आहे.

Web Title: shirur taluka western area crime and police

टॅग्स