

pune Leopard Attack viral video
esakal
खेड तालुक्यातील काळेचीवाडी गावात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. घराच्या अंगणात झोक्यावर खेळणारा एक लहान मुलगा बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला. हा संपूर्ण थरार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात अल्पावधीतच बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या असतानाच, हा प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.