Junnar News : शिवनेरीवरील शिवजयंती उत्सव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार - अतुल बेनके

शिवनेरीवर येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही अशा प्रकारचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी येथे सांगितले.
shiv jayanti 2024 celebrations at shivneri fort
shiv jayanti 2024 celebrations at shivneri fort Sakal

Junnar News : श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवरील शिवजयंती उत्सव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार व मंत्रीगणांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावर्षी शिवनेरीवर येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही अशा प्रकारचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी येथे सांगितले.

पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहात आमदार बेनके यांच्या अध्यक्षतेखाली(शनिवार ता. १० रोजी)सर्वपक्षीय शिवजयंती महोत्सव आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बेनके बोलत होते.

आमदार बेनके म्हणाले,मागील वर्षीच्या उणीवा त्रुटी दूर करून यावर्षीचा शिवजयंती उत्सव दिमाखदार पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन केले आहे. या निमित्ताने बैलगाड्यांच्या शर्यती,कुस्त्यांचा आखाडा,कबड्डी स्पर्धा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

पर्यटन विभागाच्या वतीने टेंट सिटी उभारली जाणार असून ५० पैकी ३० टेंटसाठी ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे.बचत गटासाठी स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे पर्यटन संचालक क्षमा पवार यांनी सांगितले.

माजी आमदार शरद सोनवणे यांनी शिवभक्तांची कोठेही अडवणूक न करता शिवाई देवी मंदिरापर्यंत जाऊ दिले जावे अशी सूचना केली.श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी कारखाना कर्मचाऱ्यांच्या पथकाला प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी संधी द्यावी अशी मागणी केली.

शिवनेरीवर ४ ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने गर्दीवर नियंत्रण व नजर ठेवली जाणार आहे.एक हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सुसज्ज बंदोबस्त राहील असे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी सांगितले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम, वन विभाग,आरोग्य,पोलीस प्रशासन,वीज वितरण,राज्य परिवहन मंडळ,पुरातत्व विभाग यांच्या वतीने शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने करण्यात येत असलेल्या कामे व उपाययोजनाचा आढावा सादर करण्यात आला.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक रमेश हांडे,मराठा सेवा संघाचे गणेश महाबरे,माजी उपनगराध्यक्ष ऍड.राजेंद्र बुट्टे पाटील,पोपट राक्षे,भाऊ कुंभार, संदेश बारवे, शिवाजी डोंगरे, पवन गाडेकर, राजेश डोके आदींनी यावेळी सूचना मांडल्या.

यावेळी बाजार समितीचे सभापती ऍड संजय काळे,माजी नगराध्यक्ष शाम पांडे, तहसीलदार रवींद्र सबनीस, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष गणेश महाबरे,भाऊसाहेब देवाडे,मुख्याधिकारी संदीप भोळे,गटविकास अधिकारी हेमंत गरीबे,

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ,वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश आगम,पोलीस निरीक्षक किरण अवचर,तुषार थोरात विविध शासकीय अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.तहसीलदार सबनीस यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com