Shiv Jayanti : ‘डॅलस-फोर्टवर्थ महाराष्ट्र’तर्फे अमेरिकेत शिवजयंती उत्साहात

अमेरिकेत असलेल्या डॅलस-फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
Shiv Jayanti
Shiv Jayantisakal

पुणे : अमेरिकेत असलेल्या डॅलस-फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पुढच्या पिढीला शिवाजी महाराजांचे चरित्र आणि कार्य कळावे, यासाठी सुजित साठे यांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन पुणे आणि लाल महालाशी निगडित विविध घटना दाखवणाऱ्या कार्यक्रमाची संकल्पना मांडली.

मंडळाच्या १४०हून अधिक कलाकारांनी लखूजी जाधवांचा दौलताबाद येथे झालेला घात, शिवनेरी किल्ल्यावरील शिवरायांचे बालपण, पुण्याला आगमन, पुण्याचा केलेला विकास आणि शाहिस्तेखानावरचा हल्ला असा प्रवास सादर केला, तसेच ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली.

Shiv Jayanti
Pune Weather : पुण्यात थंडी वाढली ; किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअसपर्यंत

मंडळाचे अध्यक्ष अनुप शहापूरकर म्हणाले, ‘‘शिवजयंती उत्सव साजरा करण्याबरोबरच मुलांना शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या हेतूने गेली नऊ वर्षे मंडळातर्फे शिवजयंती सोहळा आयोजित केला जातो.’’ मंडळाच्या सचिव शामली असनारे म्हणाल्या, ‘‘सुमारे ११००हून अधिक सभासद या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मिरवणुकीनंतर सर्व सभासदांसाठी पिठलं-भाकरी असा बेत ठेवण्यात आला होता.’’

मंडळातर्फे रक्तदान शिबिरही आयोजित केले होते. या शिबिरात १०० जणांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राहुल पाडळीकर आणि उमेश जालींद्रे यांनी विशेष प्रयत्न केले. मंडळाची कार्यकारी समिती आणि इतर स्वयंसेवकांनी सहकार्य केले. या वेळी सहखजिनदार श्रीरंग गोल्हार, खजिनदार युधिष्ठिर जोशी, मंडळाचे राज जांगडे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com