Video : पुढच्या वेळेस शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

वस्ती भागातील कचरा नियमित उचलला जावा, यासाठी शिवसैनिकांच्या वतीने शिवाजीनगर घोलेरस्ता क्षेत्रीय कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

गोखलेनगर (पुणे) : उच्चभ्रू भागातील कचरा नियमित उचलला जातो. मात्र गोखलेनगर, वडारवाडी, जनवाडी या परिसरातील कचरा वेळेवर उचलला जात नाही. प्रशासन दुजाभाव करत असल्याच्या आरोपावरून शिवसैनिकांनी परिमंडळ दोन उपायुक्त पुणे महापालिका नितीन उदास यांच्याकडे तक्रार केली.

वस्ती भागातील कचरा नियमित उचलला जावा, ड्रेनेज लाईन नियमित स्वच्छ करावी, धोकादायक फांद्याची छाटणी करण्यात यावी, यासाठी शिवसैनिकांच्या वतीने शिवाजीनगर घोलेरस्ता क्षेत्रीय कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. नियमित कचरा उचलला नाही, तर शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असे शिवसैनिक म्हणाले.

राज्य सरकारनं माझ्यावर जबाबदारी सोपवावी : संभाजीराजे छत्रपती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena have complained that PMC is ignoring in picking up garbage