पुणे - पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आम्हाला केवळ ३०-३५ जागा देणार असेल तर ते चालणार नाही. आम्हाला जास्त जागा हव्या आहेत. युती करायची की नाही याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतली, पण आम्ही १६५ जागांची तयारी करत आहोत, ही निवडणूक शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढणार आहोत, असे शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केले.