Neelam Gorhe
Sakal
पुणे
Neelam Gorhe : शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी होण्याचे आवाहन
Pune Politics : शिवसेना-रिपब्लिकन सेनेच्या कोथरूड मेळाव्यात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी "प्रत्येक कार्यकर्ता भविष्यात लोकप्रतिनिधी होऊ शकतो" असे सांगत नेतृत्वाच्या संधींबाबत पक्षाची बांधिलकी अधोरेखित केली.
पुणे : ‘‘प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रतिनिधी होण्याची क्षमता आहे. नगरसेवक, आमदार, खासदार होण्याची ताकद आपल्यात आहे. या प्रवासात कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा असलेला पक्ष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे,’’ असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

