
भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलून बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली होती. दरम्यान या मागणीनंतर समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून जोरदार टीका होत झाली. आता पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर बॅनर युद्ध सुरू झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात पुण्यात विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे.