शिवसेनेचे वाघ जमले भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कर्यालयासमोर अन्...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील कोथरूड येथील कार्यालयाच्या समोर भगवे झेंडे घेऊन शिवसेनेने आंदोलन केले. त्यामुळे कमळाबाईंच्या दारात सेनेच्या वाघांनी थेट धडक मारल्याने शहरात हा चर्चेचा विषय झाला होता.

पुणे : "आमचे अंगण.. आमचे रणांगण' या भाजपच्या आंदोलनाला एकेकाळच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने शुक्रवारी करारा जबाब दिला. "तुमचं अंगण.. आमचं रणांगण' हे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील कोथरूड येथील कार्यालयाच्या समोर भगवे झेंडे घेऊन आंदोलन केले. त्यामुळे कमळाबाईंच्या दरात सेनेच्या वाघांनी थेट धडक मारल्याने शहरात हा चर्चेचा विषय झाला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचा आरोप करीत आज भाजपच्या वतीने आज राज्यभर आंदोलन केले. लॉकडाऊनमुळे घराच्या अंगणातून या आंदोलन करण्याच्या सूचना पक्षाकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी "अंगण आमचे रणांगण' अशा घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गप्प बसले, तर ते सैनिक कसले. भाजपच्या या आंदोलनाला शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख शाम देशपांडे यांच्यासह विश्‍वास चव्हाण, उमेश भेलके, युवराज शिंगाडे, अनिल माझिरे, अजय भुवड यांच्यासह थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे अंगण गाठले. "तुमचं अंगण.. आमचं रणांगण' अशा घोषणा देत भगवा ध्वज पडकवित आंदोलन केले. भाजपच्या आंदोलनाला शिवसेनेच्या या वाघांनी प्रदेशाध्यक्षांच्या अंगणात जाऊन दिलेल्या प्रतिउत्तरामुळे शहरात हा चर्चेचा विषय झाला होता. 

हेही वाचा- कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलंय आनंदनगर

शहरात अनेक ठिकाणी सेनेच्या वाघांनी रस्त्यावर उतरून भाजपच्या "महाराष्ट्र बचाव' आंदोलनाला "महाराष्ट्र द्रोही बीजेपी' आंदोलन करून चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सोशल मिडीयावर त्यावरून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद रंगला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena's agitation in front of BJP state president's office