ज्ञानसागरच्या चिमुकल्यांनी शिवजयंती साजरी केली राष्ट्रपती भवनमध्ये

संतोष आटोळे 
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

शिर्सुफळ - सावळ (ता बारामती) येथील ज्ञानसागर गुरुकुलमधील चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिल्ली येथील राष्ट्रपती भवन परिसरात साजरी केली. यामध्ये चिमुकल्यांनी केलेली महाराजांची व मावळ्यांची वेशभूषा भारतीयांसह याठिकाणी उपस्थित असलेल्या परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाची ठरली.

शिर्सुफळ - सावळ (ता बारामती) येथील ज्ञानसागर गुरुकुलमधील चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिल्ली येथील राष्ट्रपती भवन परिसरात साजरी केली. यामध्ये चिमुकल्यांनी केलेली महाराजांची व मावळ्यांची वेशभूषा भारतीयांसह याठिकाणी उपस्थित असलेल्या परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाची ठरली.

भारत स्काऊट अँड गाईड आयोजित राष्ट्रीय सुवर्णबाण  पुरस्कार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी व राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इ.3 री मध्ये शिकणाऱ्या ओम बंडगर, निहाल मोहिते, रोहन आटोळे, ओम गावडे, आदित्य काशीद या 6 चिमुकल्यांचा चमू, कब मास्टर संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर आटोळे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच गदपुरी, हरीयाना येथे नवी दिल्ली मार्गे रवाना झाला. 

ज्ञानसागरचे हे चिमुकले राष्ट्रीय सुवर्णबाण पुरस्कार रॅलीसाठी महाराष्ट्रातून निवडले गेले असून ते दि. 19 फेब्रवारी ते 23 फेब्रुवारी या कालावधीत हरियाणा येथे वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. या रॅलीसाठी जात असताना या चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत  दिल्ली येथील संसद भवन, राष्ट्रपती भवन, महाराष्ट्र भवन व इंडिया गेट इत्यादी महत्वाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या वेशभूषेत भेट देऊन, राष्ट्रपती भवनाच्या परिसरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. ज्ञानसागरच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल, संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सचिव मानसिंगराव आटोळे, विभाग प्रमुख पल्लवी सांगळे, सी.ई.ओ. प्रा.संपत जायपत्रे, दीपक बिबे, प्राचार्य दत्तात्रय शिंदे, राधा नाळे, नीलिमा देवकाते यांचेसह सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Shivaji Jayanti celebrated in Rashtrapati Bhavan