

पिंपरी, ता. १६ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील शौर्य, पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास नव्या पद्धतीने उलगडणारा ‘गोष्ट इथे संपत नाही-शिवचरित्र’ हा विशेष कार्यक्रम सकाळ माध्यम समूहातर्फे चिंचवड येथे ५ जून ते ७ जूनपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. मराठ्यांच्या इतिहासातील अनेक थरारक आणि अभिमानास्पद घटनांचे प्रभावी सादरीकरण या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार असून इतिहासप्रेमींसाठी हा कार्यक्रम एक वेगळा अनुभव ठरणार आहे.
शिवचरित्र हा केवळ इतिहास नसून तो प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा आणि प्रेरणेचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेले संघर्ष, युद्धकौशल्य, मुत्सद्देगिरी आणि प्रजेप्रती असलेली बांधिलकी यांचे दर्शन या कार्यक्रमातून घडवण्यात येणार आहे. शिवकालीन इतिहासातील विविध प्रसंग नाट्यमय आणि प्रभावी शैलीत सादर केले जाणार आहेत. या कार्यक्रमामध्ये अफजलखान वध, आग्र्याहून सुटका आणि शिवराज्याभिषेक यासारख्या ऐतिहासिक घटनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रसंगामागील रणनीती, धैर्य आणि मराठ्यांचा पराक्रम प्रेक्षकांसमोर जिवंत स्वरूपात उभा केला जाणार आहे. इतिहासातील या घटना आजच्या पिढीपर्यंत प्रेरणादायी स्वरूपात पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे. शिवचरित्रातील प्रेरणादायी विचार, स्वराज्याची संकल्पना आणि मराठ्यांचा अद्वितीय इतिहास अनुभवण्याची ही एक उत्तम संधी आहे. विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी तसेच इतिहासप्रेमींसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.
कधी ः ५ जून ते ७ जून
वेळ ः दुपारी १२ ते ३
कुठे ः प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
अधिक माहिती साठी संपर्क : ९५६१५१४६७९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.