शिवरायांचा कौलनामा सापडला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुर्मीळ पत्र इतिहास संशोधक घनःश्‍याम ढाणे यांना धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात सापडले आहे. शिवरायांची अष्टकोनी मुद्रा असलेले हे पत्र त्यांच्या राज्यभिषेकाच्या पाच महिन्यांपूर्वी (२ फेब्रुवारी १६७४ रोजी) लिहिले आहे. 

हे पत्र एक प्रकारचा कौलनामा (अभयपत्र) असून, शिवरायांनी हा कौलनामा नागोजी पाटील कालभार व मसलतीचे चौगुले कालभार कसबे पाली यांना उद्देशून लिहिला आहे. हे पत्र मोडी लिपीत असून, त्याची लांबी १ फूट ३ इंच आहे; तर रुंदी ६.५ इंच आहे. ढाणे यांना २६ मे रोजी हे पत्र सापडल्याचे त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

Web Title: shivaji maharaj old letter receive