शिवाजीराव माने यांना 'राज्यस्तरीय उपक्रमशील मुख्याध्यापक' पुरस्कार

रमेश मोरे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील कै.शकुंतलाबाई शितोळे शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी माने यांना राज्यस्तरीय उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार नुकताच कोल्हापुर येथे प्रदान करण्यात आला.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कोल्हापूर येथील   जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने दिला जाणारा 'राज्यस्तरित उपक्रमशील मुख्याध्यापक' पुरस्कार छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळेचे मुख्याध्यापक शिवाजी माने यांना नुकताच कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला.

सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर पुरस्कार हरी भक्त परायण  मा. भगवान महाराज कोकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे, जि. प. सदस्य मा. भगवान पाटील, महाराष्ट्र महिती अधिकार समितीचे अध्यक्ष मा. नितीन यादव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनकल्याण सामजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष मा उदयसिंह पाटील यांनी केले व आभार सोमनाथ कोरे यांनी केले.पुरस्कारा मिळाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Web Title: shivaji mane got rajyastariy upakramshil mukhyadhyapak award