पुणे : शिवाजीनगरऐवजी आता 'या' ठिकाणावरून सुटणार एसटी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

  • वाकडेवाडीतून सुटणार एसटी

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) शिवाजीनगर येथील बसस्थानक अखेर आजपासून (ता.31) वाकडेवाडी येथील सरकारी दूध योजनेच्या जागेत स्थलांतरित होणार आहे. त्यामुळे आता शिवाजीनगरऐवजी सर्व गाड्या वाकडेवाडीवरून सुटणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोयीच्या ठिकाणी असलेले स्थानक हलविल्याने आता जाण्याची तयारी करणाऱ्या प्रवाशांना बससाठी आणखी अडीच किमी पुढे जावे लागणार आहे. खडकी, बोपोडी, दापोडी परिसरातून येणा-या प्रवाशांसाठी हे स्थानक सोयीचे आहे. मात्र शहराच्या इतर भागात येणा-यांना कसरत करावी लागणार आहे.

शरद पवारांचे धक्कातंत्र; 'या' विश्वासू नेत्याला दिले गृहमंत्री पद?

मेट्रो प्रकल्पाच्या शिवाजीनगर येथील भुयारी मार्गाचे काम एसटी स्थानकाच्या जागेतून केले जाणार आहे. त्यासाठी, एसटी स्थानकाचे स्थलांतर वाकडेवाडी येथील सरकारी दूध योजनेच्या जागेत करण्यास गेल्या वर्षी मान्यता देण्यात आली होती. या जागेवर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) एसटी उभ्या करण्यासाठी 20 फलाट तयार केले आहेत. त्यासाठीच्या शेडचे बांधकाम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. तसेच, येथून बस संचलनासाठी आवश्‍यक इतर सोयी-सुविधांची पूर्तताही नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. जुन्या स्थानकापासून नव्या स्थानकापर्यंत मीटरप्रमाणे रिक्षाने जाण्यासाठी सुमारे 40 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच या मार्गावर सिमला ऑफीस चौकातून वाकडेवाडीसाठी पीएमपीच्या बसेस देखील आहे.

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार म्हणतात, 'गांभीर्यपूर्वक...

पीएमपीची थेट सेवा नाही
वाकडेवाडी येथे झालेल्या आगारात पीएमपीच्या बसेससाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे तेथून थेट सेवा दिली जाणार नाही. स्थानकाजवळच मुख्य रस्त्यावर पीएमपीचा थांबा आहे. तेथून जाणाऱ्या बसची माहिती देण्यासाठी पीएमपीचा एक कर्मचारी वाकडेवाडी एसटी स्थानकाजवळ नेमण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपीकडून देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji Nagar bus ST stand has been temporarily relocated to Wakadwadi