एसटी स्थानक स्थलांतर रखडले 

एसटी स्थानक स्थलांतर रखडले 

पुणे - वृक्ष तोडीसाठी परवानगी देण्याची प्रक्रिया वृक्ष प्राधिकरणाकडून रखडल्यामुळे शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर लांबणीवर पडले आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम मेट्रोच्या कामावर होण्याची शक्‍यता आहे. 

शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या आवारात मेट्रोचे भूमिगत स्थानक होणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर करावे लागणार आहे. त्यासाठी खडकीतील आरे डेअरीच्या ताब्यातील सुमारे ५ एकर जागा महामेट्रोला तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आली आहे. या जागेचे विकसन करून स्थानक तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचा खर्च महामेट्रो करणार आहे. सुमारे दोन वर्ष तेथे एसटी स्थानक तेथे राहणार आहे. त्यासाठी महामेट्रोला कामकाज सुरू करायचे आहे. या जागेवर सध्या सुमारे २०० झाडे आहेत. त्या झाडांचे पुनर्रोपण त्याच ठिकाणी करण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला परवानगी मागितली आहे. त्यासाठी महामेट्रोचा गेल्या चार महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे; परंतु प्राधिकरणाकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे नियोजित काम लांबणीवर पडले आहे. 

चार दिवसांत  मंजुरीची अपेक्षा 
या बाबत महापालिकेच्या घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या वृक्ष अधिकारी व सहायक आयुक्त किशोरी शिंदे म्हणाल्या, ‘‘पाहणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी हरकती व सूचना नोंदविण्याचीही नागरिकांना सूचना केली आहे. या बाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत सादर केला जाईल. ही बैठक चार दिवसांत होईल. त्यात मंजुरी मिळाल्यावर वृक्षांचे पुनर्रोपण करण्यासाठी महामेट्रोला परवानगी देण्यात येईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com