esakal | सहकार चळवळीत शिवाजीराव काळे यांचे मोठे योगदान : शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

सहकार चळवळीत शिवाजीराव काळे यांचे मोठे योगदान : शरद पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : राज्याच्या पंचायत राज, सहकार चळवळीत माजी आमदार ,सहकारमहर्षी स्व. शिवाजीराव काळे यांचे मोठे योगदान आहे. अनेक सहकारी संस्था उभ्या करुन त्यांनी सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या नेतृत्वाची फळी तयार केली. शेतकऱ्यांच्या व सर्व सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम केले. हा वारसा त्यांचे पुत्र सभापती संजय काळे सक्षमपणे पुढे नेत आहेत. असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी व्यक्त केले.

जुन्नर बाजार समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक, माजी आमदार सहकारमहर्षी शिवाजीराव तथा दादासाहेब महादेव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, दोन कोटी रुपये खर्च करून शिवछत्रपती महाविद्यालयात उभारलेल्या पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार इनडोअर स्पोर्ट्स हॉलचे उदघाटन व स्मरणिकेचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांचे हस्ते झाले. या वेळी सभापती संजय काळे, आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: नागपूर : पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होते.या वेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे,आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार, माजी आमदार बाळासाहेब दांगट, पोपटराव गावडे,दिलीप ढमढेरे, शरद सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, सुरेश घुले, पणन संचालक सतीश सोनी, सभापती देवदत्त निकम, उपसभापती दिलीप डुंबरे ,सत्यशील शेरकर, प्रदीप गारटकर,राजश्री बोरकर, उज्वला शेवाळे , धनराज खोत आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार म्हणाले सहकारमहर्षी काळे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला. १९५७ साली विधानसभेचे सदस्य म्हणून,राज्यातील पहिल्या पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून, जिल्हा बँकेचे सलग ५५ वर्ष संचालक, अध्यक्ष म्हणून त्यांनी काम उल्लेखनीय काम केले.शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या.जुन्नर बाजार समितीची स्थापना करून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम त्यांनी केले. गरजेनुसार शेतीत बदल करून तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या माध्यमातून प्रगती साधली आहे. जुन्नर हापूस देशात प्रसिद्ध आहे. केंद्र सरकारच्या शेती धोरणावर टीका करताना पवार म्हणाले शेतमालाला चांगला भाव देण्याची भूमिका केंद्र सरकार घेत नसल्याने शेतमाल टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतमालाच्या नुकसानी पासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी बाजार समितीत्यांनी शीतगृह उभारणी करावी. काही व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे बुडवितात. शेतकऱ्यांची फसवणूक व लूट करणाऱ्या घटकांना धडा शिकवणे आवश्यक आहे.

हेही वाचा: जातीवादावरुन राष्ट्रवादीला राज ठाकरेंनी पुन्हा डिवचलं

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले केंद्र सरकार छुप्या पद्धतीने सहकार क्षेत्र अडचणीत आणण्याचे काम करत आहे.स्व. शिवाजीराव काळे, माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ , माजी आमदार वल्लभ बेनके यांनी विविध सहकारी, शिक्षण संस्था उभ्या केल्या. या संस्था वाढविण्यासाठी सभापती संजय काळे, आमदार बेनके, विघ्नहरचे अध्यक्ष सत्याशिल शेरकर यांनी एकत्रितपणे काम करावे. या वेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सभापती काळे, आमदार बेनके यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे नियोजन बाजार समितीचे जेष्ठ संचालक धनेश संचेती,निवृत्ती काळे, संतोष घोगरे, प्रकाश ताजणे, संतोष तांबे, सचिव रुपेश कवडे, उप सचिव शरद घोंगडे यांनी केले.

loading image
go to top