स्वामी चिंचोली येथे शिवमचे बालसंस्कार शिबीर

प्रा. प्रशांत चवरे
रविवार, 29 एप्रिल 2018

स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये हे पाच दिवसीय निवासी शिबीर होणार आहे. शिबीरामध्ये १० ते १४ वर्ष वयोगटातील २०० बालकांना प्रवेश देण्यात येणार आहे. शिबीराचे उदघाटन बुधवारी(ता.०२) सकाळी दहा वाजता बारामती उपविभागीय पोलस अधिकारी बापु बांगर, बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील तसेच दौंडचे तहसिलदार बालाजी सोमवंशी यांचे उपस्थितीत होणार आहे.

भिगवण : स्वामी चिंचोली(ता.दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये घारेवाडी(ता.कराड) येथील शिवम प्रतिष्ठानच्या वतीने २ मे ते ६ मे दरम्यान पाच दिवसीय निवासी बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती शिबीर समन्वयक डॉ. जयप्रकाश खरड व दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिली आहे. 

स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये हे पाच दिवसीय निवासी शिबीर होणार आहे. शिबीरामध्ये १० ते १४ वर्ष वयोगटातील २०० बालकांना प्रवेश देण्यात येणार आहे. शिबीराचे उदघाटन बुधवारी(ता.०२) सकाळी दहा वाजता बारामती उपविभागीय पोलस अधिकारी बापु बांगर, बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील तसेच दौंडचे तहसिलदार बालाजी सोमवंशी यांचे उपस्थितीत होणार आहे. शिबिराचा समारोप ६ मे २०१८ रोजी सायंकाळी ४ वाजता शिवमचे संस्थापक व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख व शिवमचे अध्यक्ष डॉ. शंतनू कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत  होणार आहे. या वेळी इंद्रजित देशमुख पालक व मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. 

शिबिरामध्ये मुलांच्या सामाजिक, बौद्धिक, शारिरीक विकासाचेदृष्टीने प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांच्यामधील कलागुण विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मागील वीस वर्षापासून घारेवाडी येथे दरवर्षी बालसंस्कार शिबिर होते. त्यास मिळणारा प्रतिसाद विचारात घेऊन ग्रामीण भागातील मुलांना अधिकाधिक संधी मिळावी या हेतुने हे शिबार स्वामी चिंचोली(ता.दौंड) येथे आयोजित करण्यात आले असुन घारेवाडी येथील संपूर्ण प्रशिक्षक टीम या शिबिराला मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहे. पालकांनी मुलांना या बालसंस्कार शिबीरासाठी पाठवावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: shivam child training in bhigwan