शिवसेनेला खिंडार, शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सुदाम बिडकर
शनिवार, 21 जुलै 2018

पारगाव (पुणे) : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील अनेक शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या उपस्थीतीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने तालुक्याच्या पुर्वभागात शिवसेनेला खिंडार पडले आहे.
येथील शिवसेनेचे पदाधिकारी अमोल पोंदे, माऊली पोंदे, नाथा वाळुंज व भाऊसाहेब पोंदे व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला या सर्वांचा विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी खरेदी विक्रि संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज, जिल्हा दुध संघाचे संचालक दौलत लोखंडे, उपसभापती नंदाराम सोनावले, मनोज रोडे, पंढरीनाथ काकडे, बाळासाहेब टाव्हरे, सचिन जाधव, उध्दवराव लंके, पोपट पोंदे, सरपंच जयसिंग पोंदे, उपसरपंच भीमाबाई मांजरे उपस्थीत होते. 

Web Title: shivasainik shifted to rashtrawadi