छत्रपती संभाजी महाराज की जय, म्हणत त्यांनी फोडल्या गाड्या, कारण...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

बिडीला दिलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव हटविण्यासाठी शिवधर्म फाउंडेशनचे उपोषण गेल्या चार दिवसांपासून सुरु आहे.

पुणे : बिडीला दिलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव हटविण्यासाठी शिवधर्म फाउंडेशनचे उपोषण गेल्या चार दिवसांपासून सुरु आहे. आंदोलनास आता चांगलीच धार आली आहे. या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी  कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरु केली आहे. गुजराथ बॉर्डरवर या गाड्या छत्रपती शिवजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने घोषणा देत फोडण्यात आल्या. फोडलेल्या गाड्या संभाजी बिडी घेऊन जाणार्या होत्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी तीन ते चार गाड्या फोडण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षण समितीचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी त्वरित संभाजी बिडीचे नाव बदलले नाही तर कंपनीच्या व्यवस्थापना धडा शिकवला जाईल असा इशारा दिला आहे. 

मराठा आरक्षण कृती समिती, आखिल भारतीय मराठा सेवा संघ, शिवसेनेचे नेते कुलदीप कोंडे, सारथी वाहतूक आघाडी असोसिएशन, आखिल भारतीय होलार समाज संघटना, राष्ट्रीय विद्यार्थी संघटना शिवशंभू स्वराज्य संघटना, अशा अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

पुण्यात रुग्ण फिरला तीन तास अन् उपचार पिंपरीत 

यावेळी मराठा आरक्षण कृती समितीचे समन्वयक रामभाऊ जगताप यांनी कंपनीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. पुरंदर किल्याच्या पायथ्याला हे आंदोलन सुरु आहे. यावेळी 'जय भवानी, जय शिवाराय' अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनास अनेकांनी पाठिंबा दिला आहे. माजी पोलिस अधिकारी भानूप्रताप बर्गे यांनी उपोषण स्थळाला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. उपोषणाला महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

बाउन्सरचा 'डोस'; रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये दहशत

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivdharma Foundation's agitation continues