कोथरूडमध्ये शिवजयंती उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

कोथरूडमध्ये साकारले आरमारातील जहाज 
कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात श्रीमान योगी प्रतिष्ठानतर्फे आरमारातील जहाज साकारले असून, हुबेहूब तयार केलेले हे जहाज १०० फूट लांब आणि ३० फूट उंचीचे आहे. ते पाहण्यासाठी शिवप्रेमी गर्दी करीत आहेत. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्या उपस्थितीत या देखाव्याचे उद्‌घाटन झाले. श्रीमान योगी प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक, अभिनेते रमेश परदेशी, सरसेनापती हंबीरराव चित्रपटातील संपूर्ण कलाकार, मोनिका मोहोळ, नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, अल्पना वर्पे, बडेकर ग्रुपचे प्रवीण बडेकर, नवनाथ जाधव आदी उपस्थित होते. हा देखावा महेश रांजने यांनी तयार केला आहे.

कोथरूड - छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे येणाऱ्या जयंतीनिमित्त कोथरूडमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. 

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ओम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कोथरूड शिवजयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. सकाळी नऊ वाजता सचिन फ्रेंड्‌स सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत चहापानाचे आयोजन केले होते. शुक्रवार (ता. १३) ते गुरुवार (ता. १९) पर्यंत नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त मनोरंजनाची मेजवानी कोथरूडकरांना मिळणार आहे. सुतारदरा येथील श्रीराम कॉलनीमधील श्री गणेश मित्र मंडळातर्फे सिंहगडावरून शिवज्योत आणण्यात आली. यशवंत महाराज फाले यांचे शिवचरित्रावर कीर्तन झाले. एसएनडीटीजवळील जयदीप मंडळ, शिवसेना श्री शिवसाई संस्था आयोजित अखिल पौड रस्ता शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनेदेखील कार्यक्रम झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivjayanti Celebration in kothrud