Shivjayanti : शिवनेरीवर आज शिवजन्मसोहळा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर सोमवारी (ता. १९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ३९४ वा शिवजयंती सोहळा साजरा होत आहे.
Shivjayanti
Shivjayantisakal

जुन्नर - छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर सोमवारी (ता. १९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ३९४ वा शिवजयंती सोहळा साजरा होत आहे. शासकीय पातळीवर या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, मुख्यमंत्री सकाळी आठ वाजता जन्मोत्सवासाठी किल्ल्यावर उपस्थित राहणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, तसेच मंत्रिमहोदयांच्या उपस्थिती हा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येईल. या उत्सवाच्या निमित्ताने शिवजन्मस्थान, शिवकुंज, शिवाईदेवी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. किल्ल्यावरील दरवाजांना फुलांची तोरणे लावण्यात आली आहेत. सकाळी शिवाई देवीची शासकीय महापूजा आयुक्त कुलकुलवार व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत होईल.

शिवनेरीवरील वनविभागाच्या ‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. गडाच्या पायथ्याशी शिवभक्तांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी यावर्षी वाहनतळ वाढविण्यात आला आहे. उत्सवासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com