दानवे यांच्या वक्तव्याबद्दल शिवसेनेचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

पिंपरी - शेतकऱ्यांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेतर्फे आज (शुक्रवारी) भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. 

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात शहरप्रमुख व महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नगरसेवक नीलेश बारणे, ॲड. सचिन भोसले, नगरसेविका मीनल यादव, रेखा दर्शिले, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, विनायक रणसुभे, राम पात्रे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे, सल्लागार भगवान वाल्हेकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे गरजेचे आहे. परंतु, शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे शेतकऱ्यांबाबत बेताल वक्तव्य करत आहेत. शेतकरी राजा हा देशाला धान्य पुरविण्याचे काम करतो. त्यांच्याबद्दल सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असे बेताल वक्तव्य कसे करू शकतात. दानवे यांना शेतकऱ्यांचे दु:ख माहीत असतानाही त्यांनी शेतकऱ्यांबद्दल असे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे, असे कलाटे म्हणाले.  

चिंचवडे म्हणाले, ‘‘भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे वारंवार बेताल वक्तव्य करत आहेत. शेतकऱ्यांबद्दल त्यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. यापुढे त्यांनी शेतकऱ्यांबाबत बेताल वक्तव्य केल्यास त्यांच्या विरोधात शिवसेना अधिक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार आहे.’’ 

प्रतीकात्मक पुतळ्याचे वडगावला दहन
वडगाव मावळ - शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा निषेध करून त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, माजी तालुकाध्यक्ष ॲड. दिलीप ढमाले, यशवंत मोहोळ, ॲड. खंडुजी तिकोने, राजू शिंदे, युवक अध्यक्ष गणेश काजळे, पंढरीनाथ ढोरे, भाऊसाहेब कालेकर, अनंता लायगुडे, शहराध्यक्ष किसनराव वहिले आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले. 

Web Title: shivsena agitation for danave talking