हा शिवसेनेचा विस्तार

हा शिवसेनेचा विस्तार
Published on

...हा शिवसेनेचा विस्तार ः उपमुख्यमंत्री शिंदे

ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात दाखल; ऑपरेशन टायगर अखेर पूर्ण

मुंबई : शिवसेनेत (उबाठा) बंडखोरी केलेल्या सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सोमवारी (ता. २२) अधिकृत प्रवेश केला. दरम्यान, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत सहाही खासदार शिवसेनेच्या तिकिटावर आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवतील, असे त्यांनी या वेळी जाहीर केले. तसेच याआधी शिवसेना वाचवण्यासाठी बंड केले होते आता शिवसेनेच्या विस्ताराचा हा दुसरा टप्पा आहे, असेही ते म्हणाले.
प्रवेशापूर्वी शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी जवळपास दोन तास बैठक पार पडली. त्यानंतर सर्व खासदारांसह यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन प्रवेशाची घोषणा केली.
शिंदे यांनी ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश आष्टीकर आणि संजय जाधव या सर्वांचे शिवसेनेत स्वागत करताना शिवसेनेच्या (उबाठा) कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. तसेच त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला दिला.
शिंदे म्हणाले की, २०२२ मध्ये शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेब, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला होता. तो पहिला टप्पा होता. आज सहा खासदारांच्या प्रवेशाने त्या लढ्याचा आणि शिवसेना विस्ताराचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. चार वर्षांनंतर चौकार नाही, तर षटकार मारला, असा टोला शिंदे यांनी लगावला. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व जिथे आहे, तिथेच खरे शिवसैनिक आहेत. हे खासदार कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी आलेले नाहीत, अशा शब्दांत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. मतदारसंघाचा विकास, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि बाळासाहेब यांच्या विचारांशी निष्ठा यासाठी या खासदारांनी हा निर्णय घेतल्याचे शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com