'महिलांच्या संघटनात्मक बांधणीवर शिवसेनेचा भर'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे - शिवसेनेने आगामी निवडणुकीत महिलांच्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. वस्तीपासून ते सोसायटीपर्यंत प्रत्येक महिलेला शिवसेनेशी जोडण्याचे नियोजन केले आहे. महिलांसाठी प्रभाग स्तरावर बैठका, मेळावे आणि प्रशिक्षण शिबिर घेण्यासह सोशल मीडियाद्वारे महिलांपर्यंत शिवसेनेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती शिवसेनेच्या महिला आघाडीच्या संघटिका सविता मते यांनी "सकाळ'ला दिली. 

युवासेनेने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने "सकाळ'ने मते यांच्याशी संवाद साधला. त्यांनी महिलांच्या संघटनात्मक बांधणीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. लोकसभा व विधानसभा या आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेच्या महिला आघाडीकडून प्रत्येक प्रभागात 50 महिलांची निवड करण्यात आली. त्या प्रत्येकी शंभर महिलांशी संपर्क साधणार असून, वस्ती ते सोसायटी असा उद्देश ठेवून, त्या संघटनात्मक बांधणीसाठी मदत करणार आहेत. त्याशिवाय प्रभागवार बैठक, कार्यक्रम आणि रोजगार प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत. त्याद्वारे महिलांचे नेटवर्किंग उभे करण्यात येत आहे. तसेच, फेसबुक आणि व्हॉट्‌सऍप ग्रुपद्वारे महिलांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे मते यांनी सांगितले. 

मते म्हणाल्या, ""महिलांच्या संघटनात्मक बांधणीवर आम्ही भर देत आहोत. शिवाजीनगर, कसबा पेठ, कोथरूड आणि खडकवासला या पाच मतदारसंघातील महिला मतदारांचे नेटवर्किंग उभे करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यासाठी व्हॉट्‌सऍप ग्रुपही तयार केले आहेत. याशिवाय शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांच्या नेतृत्व उभारणीसाठी खास लक्ष दिले जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचे महिला नेतृत्व प्रखरपणे सामोरे येईल.''

Web Title: Shivsena focus on the organization of women