Video : साईबाबा जन्मभूमीबाबत नीलम गोऱ्हे म्हणाल्या...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

शिर्डी आणि पाथरीच्या नागरिकांवर अन्याय होणार नाही. साईबाबा यांनी श्रद्धा आणि सबुरीचा जगाला संदेश दिला आहे.

पुणे : साईबाबा यांच्या जन्मभूमीवरून निर्माण झालेल्या गैरसमजातून शिर्डीच्या ग्रामस्थांनी पुबंद पुकारल्याने भाविकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे हा बंद स्थगित करावा. येत्या आठवड्याभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिर्डी आणि पाथरीतील प्रमुख प्रतिनिधींशी चर्चा करून यावर समतोल तोडगा काढतील, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या विकास आराखड्याचे काम झाले असून लवकरच भूमिपूजन करण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यावरून शिर्डीतील ग्रामस्थांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. साईबाबा यांचे जन्मस्थळ पाथरी असल्याचा पुरावा नसतानाही तसा दावा केला जात आहे. यामुळेच शिर्डीच्या ग्रामस्थांनी रविवार (ता. 19) पासून बेमुदत शिर्डी बंदची घोषणा केली आहे.

- पवारसाहेब चारवेळा मुख्यमंत्री आणि मी...; अजित पवार

त्याबद्दल नीलम गोऱ्हे पुण्यात बोलताना म्हणाल्या, मी शिर्डीला गेलेली असताना तेथील ग्रामस्थांची काय भूमीका आहे हे याबाबत मी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली होती. आज पुन्हा ग्रामसभेत बंदचा निर्णय झाल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यात त्यांनी शिर्डी आणि पाथरी येथील प्रतिनिधींशी स्वतंत्र चर्चा करून यावर समतोल विचाराने योग्य तो तोडगा काढला जाईल.

- अजित पवार यांचा हायपरलूप प्रकल्पावरून फडणवीस यांना दे धक्का?

शिर्डी आणि पाथरीच्या नागरिकांवर अन्याय होणार नाही. साईबाबा यांनी श्रद्धा आणि सबुरीचा जगाला संदेश दिला आहे. त्यामुळे गैरसमजातून भाविकांना त्रास होईल, असा कोणताही निर्णय न घेता, बंदला स्थगिती द्यावी, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

- नाइट लाईफबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'मी या निर्णयाच्या...'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader Neelam Gorhe commented about Shirdi Saibaba birthplace