esakal | नाइट लाईफबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'मी या निर्णयाच्या...'
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash-Ambedkar

राज्यातील महानगरांमध्ये रोजगार आणि नोकरीच्या निमित्ताने अनेक नागरिक येत असतात. त्यापैकी अनेकांना रात्रपाळीत काम करावे लागते.

नाइट लाईफबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'मी या निर्णयाच्या...'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील केवळ मुंबईच नव्हे, सर्वच महानगरांमध्ये नाइट लाइफची आवश्यकता असल्याचे मत वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी (ता.18) पुण्यात बोलताना व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मी स्वत: हे सर्व आयुष्य जगलोय, उपभोगले आणि अनुभवले असल्याने, मी या नाइट लाईफ चर्चा बाजूने असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

- धोनीला करारातून वगळण्याबाबत दादाचे 'नो कमेंट्स प्लीज'!

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काय निर्णय घेतला हे माहित नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला पाठिंबा आहे, असे समजू नका. केवळ मी नाइट लाईफच्या बाजूने आहे, असे म्हणत त्यांचा ठाकरे यांच्या नाइट लाईफच्या  निर्णयाला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे ही यावेळी स्पष्ट झाले.          

- हर्षवर्धन जाधव यांना राज ठाकरे मनसेत घेणार का?

ते म्हणाले, 'राज्यातील महानगरांमध्ये रोजगार आणि नोकरीच्या निमित्ताने अनेक नागरिक येत असतात. त्यापैकी अनेकांना रात्रपाळीत काम करावे लागते.'

- शिवसेना खासदार संजय राऊत पोलिसांच्या ताब्यात पण...

loading image