शिवसेना वगळता इतर पक्ष म्हणजे दलालांच्या टोळ्या - संजय राऊत

sanjayraut
sanjayraut

वाघोली - शिवसेना वगळता इतर पक्ष दलालांच्या टोळ्या आहेत. या टोळ्यातील दलालांना मतदार थारा देणार नाहीत. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचा विजय निश्चित आहे. असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. 

वाघोलीतील कल्याण मंगल कार्यालयात आयोजित शिरूर हवेली शिवसेना कार्यकर्ता आढावा मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा प्रमुख राम गावडे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, श्रद्धा कदम, जयश्री पलांडे, अनिल काशीद, राजेंद्र पायगुडे, पोपट शेलार, विशाल सातव, विजया शिंदे, सविता कांचन, शैलजा दुर्गे, युवराज दळवी आदी उपस्तीत होते. 

राऊत पुढे म्हणाले, खेड लोकसभा मतदार संघात शिवसेनेला मतदान मिळते. मग विधानसभेला का मिळत नाही ? लोकांपर्यंत पोहचेल असा उमेदवार नक्की विजय मिळवून देईल. राज्यातील काही मतदार संघात राजकीय पक्षांचे काही चालत नाही. त्यापैकीच शिरूर हवेली मतदार संघ आहे. येथेही पक्षांचे काही चालत नाही. उमेदवाराच्या जनसंपर्कावरच विजय मिळतो. येथील मतदार चंचल आहेत. ते चांगले आणि वाईट यातील फरक जाणतात. राज्यात शिवसेनेची सता येणार. त्यामुळे शिरूर हवेलीतही शिवसेनेचा विजय निश्चित आहे. 100 बाबुराव आले तरी उपयोग होणार नाही. योग्य उमेदवार येथे दिला जाईल. तुम्ही एकनिष्ठ पणे काम करा. असे आवाहन यावेळी राऊत यांनी केले. या प्रसंगी अनेक पद्धधिकार्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अन उमेदवारीच मागितली                          ‎
फेसबुक व व्हाट्सअप ओपन केले की शिवसेनेचे पदाधिकारी अन्य पक्षाचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या सोबत दिसतात. मग निवडणूक कोणाच्या जीवावर लढवायची.असा प्रश्न पडतो. कार्यकर्ते का येत नाही याचा आढावा घेतला पाहिजे. असा प्रश्न उपस्तीत करून माझा जनसंपर्क व आता पर्यंतची कार्यकिर्द पाहता मला विधानसभेचे तिकीट द्यावे अशी मागणीच माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पलांडे यांनी खासदार राऊत यांच्याकडे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com