Pune Rain : पावसाच्या पाण्यात उतरुन सुषमा अंधारेंचं मदतकार्य? फोटोमागचं सत्य जाणून घ्या...

यंदाही पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
Sushma Andhare
Sushma AndhareSakal
Updated on: 

परतीच्या पावसाने राज्यभरात चांगलाच हाहाकार माजला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. या सगळ्यामध्ये बचावकार्य आणि मदतकार्यही सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Sushma Andhare
Sushama Andhare: गुन्हा दाखल होऊनही सुषमा अंधारे भूमिकेवर ठाम कशा?

या फोटोत सुषमा अंधारे कमरेपर्यंत पाण्यात उतरल्या आहेत. त्यांनी आपल्या खांद्यावर एका व्यक्तीला बसवलं आहे आणि त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो यंदाच्याच पावसात बचावकार्यादरम्यानचा असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र आम्ही या फोटोमागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

Sushma Andhare
Sushma Andhare: माझं ५ वर्षांचं बाळ शिवसेनेला दत्तक; सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?

यासाठी 'सकाळ'ने सुषमा अंधारे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा फोटो आपलाच असल्याचं सांगितलं. यासोबतच त्यांनी या फोटोमागचं सत्यही सांगितलं. हा फोटो मागच्या वर्षी आहे. त्यावेळी अंधारे कोणत्याही पक्षामध्ये नव्हत्या, राजकारणामध्ये सक्रीय नव्हत्या. त्यावेळी त्यांनी पुण्यातल्या शांतीनगर भागात झालेल्या पावसाच्या वेळी त्यांनी बचावकार्यात भाग घेतला होता. तेव्हाचा हा फोटो आत्ताचा सांगून व्हायरल होऊ लागला आहे. अशा प्रकारचे फोटो चुकीच्या माहितीसोबत व्हायरल करू नये, असं आवाहनही सुषमा अंधारे यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Northeast Monsoon 2026 Begins Across South India
Pune district orders a 20% water supply cut as Khadakwasla reservoir storage declines.
Drunk and Drive
Archana Tambe
Marathi News Esakal
www.esakal.com