तिरडी बांधून शिवसेनेचे आयुक्त कार्यालयात आंदोलन

संदीप जगदाळे
शनिवार, 5 मे 2018

हडपसर - प्रभाग क्र. २६ मधील नागरी सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी सहायक आयुक्त कार्यालयात सुस्त प्रशासनाची तिरडी बांधून शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. नियमीत व पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, हांडेवाडी रस्ता अतिक्रमण मुक्त करावा, मोकाट डुकरांवर कारवाई करावी आदी प्रश्न घेवून प्रशासना विरोधात घोषणा देत आंदोलकांनी अधिका-यांनी धा-यावर धरले. तसेच आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत प्रभागातील नागरिक टॅक्स भरणार नाहीत अशी भूमीका घेतली. आठ दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे अश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे व नगरसेविका प्राची आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. याप्रसंगी अभिजीत बाबर, शिवा शेवाळे, विकास भुजबळ, अभिमणू भानगिरे, सचिन तरवडे, किरण जंबुकर, रोहित पवार, अनिल जाधव, प्रवीण हेलगे यांसह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. 

नगरसेवकांचा राजीनामा देण्याचा इशारा
भानगिरे म्हणाले, प्रभागातील नागरिक कर भारतात. त्यांना सुरऴीत पाणीपुरवठा होत नाही, मात्र औद्योगिक वसाहतीमध्ये बेकायदेशीर पाण्याचे कनेक्शन दिले जातात. यावर अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यावेळी मी बेकायदा कनेक्शन दाखविले तर तुम्ही राजीनामा द्या, नाही दाखवीले तर मी राजीनामा देतो. त्यानंतर अधिका-यांची बोलती बंद झाली. 

सहाय्यक आयुक्त सुनिल यादव यांनी डुकरांचा प्रश्न सोडविण्यासाठी डुकर पालन व्यावसायिकांचे पुर्नवसन केले जाईल, पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, अतिक्रमण आठ दिवसात काढली जातील व नियमितपणे अतिक्रमण कारवाई केली जाईल असे यावेळी अश्वासन दिले.

Web Title: Shivsena movement in the office of Commissioner