esakal | कोथळा काढण्याचं राऊतांचे वक्तव्य; भाजप करणार पोलिसात तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

पाठीत खंजीर खूपसण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी आव्हान देत म्हटलं की, पवारांनी खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडेन.

कोथळा काढण्याचं राऊतांचे वक्तव्य; भाजप करणार पोलिसात तक्रार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यात शिवसेनेच्या एका कार्यक्रमात केलेल्या कोथळा काढण्याच्या वक्तव्याप्रकरणी राऊतांविरोधात पुण्यात भाजप तक्रार दाखल करणार आहे. डेक्कन पोलिस ठाण्यात भाजप संजय राऊत यांच्याविरोधात लेखी तक्रार अर्ज दाखल करणार आहे.

शिवसेनेचे खासदार, बोरुबहाद्दर संजय राऊथ यांनी कोथळा बाहेर काढू असं वक्तव्य केलं आहे. ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही. त्यांनी एक प्रकारे धमकी दिली आहे. नारायण राणेंना शुल्लक कारणे दाखवून अटक केली. आज आम्ही संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही असंही भाजपने म्हटलं आहे.

संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी म्हटलं की, पाठीत खंजीर खुपसण्याची आपली परंपरा नाही. आपण समोरून वार केला आहे. कोणावर कोण खटला दाखल करताय ते बघावं लागेल. त्यांना शिवचरित्र पाठवू आणि कोथळा काढणे म्हणजे काय याचा अर्थ सांगू असेही संजय राऊत म्हणाले. आम्ही शिवरायांचे मावळे आहे आणि पाठीमागून वार करत नाही. समोरून कोथळा काढतो असं म्हटलं होतं. त्यांना याचा एवढा त्रास झाला की थेट गुन्हेच दाखल करायला सांगितले. आता समोरून वार केल्यावर कोथळाच निघणार ना? असा सवाल राऊतांनी केला.

हेही वाचा: शरद पवार यांच्याकडून पहिल्या निवडणुकीला उजाळा

काय म्हणाले होते संजय राऊत?

चंद्रकांत दादा पाटील यांनी खंजीर खूपसणे असं काही म्हटले. चंद्रकांत दादांना मी सांगतो आणि सन्मानाने सांगतो, आम्ही समोरून कोथळा काढतो मागून खंजीर खुपसत नाही असं एका कार्यक्रमात संजय राऊत म्हणाले होते. पुण्यातील शिरुर हवेलीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राऊत बोलत होते. चंद्रकांत दादा हरिश्चंद्राचे अवतार आहेत. आम्ही एकत्र काम केलंय. मी सतत आव्हान दिलं आहे की पवारांनी पाठीत खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा मी राजकारण सोडतो. मराठ्यांची औलाद आहे, आम्ही समोरून वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा समोरून कोथळा काढला होता असे राऊत म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झाले असून संजय राऊत यांच्याविरोधात पुण्यातील डेक्कन पोलिसात तक्रार देण्यात येत आहे.

हेही वाचा: अमरावतीत दोन मंत्री आमने-सामने, यशोमती ठाकूरही दाखल करणार अर्ज

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं की, राऊत हे शरद पवारांसाठी काम करतात. उद्धव ठाकरेंना हे कळत नाही की, राष्ट्रवादी त्यांची एक एक पंचायत समिती खात आहे आणि त्यांचे कार्यकर्तेसुद्धा राष्ट्रवादीत जात आहेत. हे फक्त आगे बढो बढो म्हणतायत. 'महाराष्ट्रातील शाळेत आता धडा द्यायचा फक्त शिल्लक आहे की, पवारांनी कोणाकोणाच्या पाठीत खंजीर खुपसला, वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला?' असा सवाल करताना चंद्रकांत पाटील यांनी व्वा राऊत व्वा असं म्हणत उपरोधिक टोलाही लगावला होता.

loading image
go to top