गोऱ्हे बुद्रुकच्या सरपंचपदी शिवसेनेचे लहू खिरीड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

सरपंच सचिन पासलकर यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली. ही निवडणूक मंडल अधिकारी रोहिदास जाधव हे अध्यासी अधिकारी म्हणून उपस्थित होते.

खडकवासला - गोऱ्हे बुद्रुक ग्रामपंचायतीचा सरपंचपदी लहू निवृत्ती खिरीड यांची बिनविरोध निवड झाली. ते शिवसेनेचे गटप्रमुख आहेत. 

सरपंच सचिन पासलकर यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली. ही निवडणूक मंडल अधिकारी रोहिदास जाधव हे अध्यासी अधिकारी म्हणून उपस्थित होते. या निवडणुकीला रोजी कुमकट्टी, सरिता भोरडे, लहू खिरीड, मुक्ताबाई खिरीड, सुजित तिपोळे, नरेंद्र खिरीड, रेखा जाधव, सचिन पासलकर उपस्थित होते. 11 सदस्यांपैकी आठ सदस्य हजर होते. त्यापैकी लहू खिरीड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाली. अध्यासी अधिकारी, पॅनल प्रमुख माजी उपसरपंच कुंडलिक खिरीड, माजी उपसरपंच सुशांत खिरीड यांनी त्यांचे निवडीबद्दल सत्कार केला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: shivsena sarpanch lahu khirid at gorhe budruk