Hadapsar News : सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या अनागोंदी विरोधात शिवसेनेचे आंदोलन

'गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा त्रास नागरिक सहन करीत आहेत.
shivsena agitation
shivsena agitationsakal
Updated on

हडपसर - मूलभूत सुविधांचा अभाव, दूषित पाण्याचा पुरवठा, रस्त्यांवरील अतिक्रमणे, कार्यालयातील हजेरी प्रणालीतील अनियमितता आणि अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, बंद असलेली बायोमेट्रिक यंत्रणा, नागरी समस्या सोडविण्यात होणारी टाळाटाळ आणि एकूणच प्रशासनाच्या बेजबाबदार, बेशिस्त व अकार्यक्षम कारभारामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास, या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हडपसर-मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. शहर प्रमुख प्रमोद भानगिरे व जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com