पुणे - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना यांची युती कायम ठेवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर गुरुवारी पुण्यात भाजप व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये पहिली बैठक झाली. यामध्ये जागा वाटपाबाबत निर्णय झाला नाही. मात्र, शिवसेनेने जागांबाबत त्यांचा प्रस्ताव दोन दिवसात भाजपकडे देण्याविषयीची चर्चा या बैठकीमध्ये झाली.