निमसाखरेत शिवसेनेचे उपोषण मागे ; मागण्या मान्य

राजकुमार थोरात 
शनिवार, 1 डिसेंबर 2018

वालचंदनगर : निमसाखर (ता.इंदापूर) येथे गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, चौकामध्ये हायमास्ट दिवे बसविणे व मुख्य चौकामध्ये शौचालय बांधण्याची शिवसेनेची मागणी ग्रामपंचायतीने मान्य केल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केलेले  पोषण मागे घेण्यात आले.  

वालचंदनगर : निमसाखर (ता.इंदापूर) येथे गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, चौकामध्ये हायमास्ट दिवे बसविणे व मुख्य चौकामध्ये शौचालय बांधण्याची शिवसेनेची मागणी ग्रामपंचायतीने मान्य केल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केलेले  पोषण मागे घेण्यात आले.  

निमसाखर गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या होत आहेत. तसेच गेल्या अाठवड्यामध्ये दोन ठिकाणी बंद घराची घरफोडी करण्यात आली. तसेच गावाच्या मुख्य चौकालगत माध्यमिक व ज्युनिअर काॅलेज असून चौकामध्ये अनेकवेळा रोडरोमिओ घिरट्या घालत असतात. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने गावामध्ये हायमास्ट दिवे बसविले होते. मात्र मुख्य चौकामध्ये हायमास्ट दिवे बसविले नसल्यामुळे रात्री-अपरात्री दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने चौकामध्ये दिवे बसविण्याची व सार्वजनिक ठिकाणी शौचालये उभारण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हा युवाप्रमुख सुदर्शन अनिलराव रणवरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.

मात्र, या मागणीकडे ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने रणवरे यांनी आज शनिवार (ता.१) पासुन ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास सुरवात केली.  उपोषण सुरु होताच ग्रामसेवक एस. एम. भिलारे व ग्रामपंचायत सदस्य अनिल रणवरे यांनी रणवरे यांनी  सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, मुख्य चौकाम्ये हायमास्ट दिवा बसवणे व  मुख्य चौकात शौचालय उभारण्याचा ठराव करण्यात आला असल्याचे लेखी दिल्यानंतर आश्‍वासन मागे घेण्यात आले. यावेळी शिवसेनेचे योगेश कणसे, संदीप चौधरी, अॅड.नितीन कदम, नवनाथ रणवरे, सचिन रणवरे, लक्ष्मण साळुंके, मंगेश निंबाळकर, उद्योजक संतोष रणसिंग, मंदार मोरे, दिनेश बर्गे, काका पाटील उपस्थित होते.
-

Web Title: Shivsena's fasting Strike taken back in Nimshakhar ; demands Accepted