पुणे - सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते माणिकबाग हा उड्डाणपूल पूर्ण होऊनही फक्त सत्ताधाऱ्यांच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा चालू असल्याने हजारो नागरिक दररोज वाहतूक कोंडीत अडकून त्रस्त झाले आहेत. या बेफिकिरीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज (ता.२०) उड्डाणपुलावर होव हावन करत ‘ॐ फट स्वाहा... मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रकट व्हा...' अशा घोषणा दिल्या.