#ShivshahiIssue शिवशाहीतील बिघाडामुळे प्रवाशांना विलंब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

पुणे : शिवशाही बसमध्ये होणाऱ्या बिघाडामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बुधवारी सकाळी स्वारगेट डेपोतून कोल्हापूरकडे जाणारी शिवशाही बस कात्रज घाटात बंद पडल्याने प्रवाशांना एक तास ताटकळत थांबावे लागले. विशेष म्हणजे बसमधील विद्युत वहनाची व्यवस्था निकामी झाल्याची पूर्वकल्पना असूनही ही बस सोडण्यात आली होती. 

या बसमध्ये एसटी महामंडळाचे वाहक नसल्यामुळे, तसेच बिघाड झाल्यास दंड आकारण्याची तरतूद असल्याने अनेकदा बिघाडाबाबत कंत्राटदाराकडून वाहतूक विभागास माहिती देण्याबाबत टाळाटाळ केली जाते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊनही कंत्राटदारावर कारवाई करण्यात प्रशासनावर बंधने येतात.

महिन्यातून तीन ते चार वेळा शिवशाही बस बंद पडतात. बंद पडलेल्या बसला दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतो. अनेक वेळा बस बंद पडूनही कंत्राटदाराकडून त्याबाबत वाहतूक विभागास माहिती दिली जात नाही. याबाबत प्रवाशांकडून तक्रार करण्यात आल्यावर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येते, असे वाहतूक विभागातील सूत्रांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

शिवशाही बस बंद पडण्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे बरेचदा अपेक्षित वेळेत नियोजित ठिकाणी पोचता येत नाही.  
-बेला धामणगावकर, प्रवासी

- एकदा बस बंद पडल्यावर आकारण्यात येणार दंड : १० हजार रुपये.
- महिन्यातून बस बंद पडण्याचे अधिकृत प्रमाण :     ३ ते ४ 
- दरदिवशी कोल्हापूरकडे होणाऱ्या फेऱ्या :     २०
- स्वारगेट ते कोल्हापूर भाडे :    ३६६  रुपये
 
Web Title: shivshahi bus issue passenger