काळेवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे मोटार जळून खाक, दोन जखमी 

संदीप घिसे
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पिंपरी (पुणे) - शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मोटार जळून खाक झाली. या आगीत दोघेजण किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे काळेवाडी येथे घडली.

अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ज्योतीबानगर येथे मोटारीला आग लागल्याची माहिती उमेश गुंड यांनी पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्रास दिली. त्यानुसार चिखली आणि मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब मदर तेरेसा उड्डाण पुलाशेजारी काळेवाडी येथे दाखल झाला.

महिंद्रा झायलो (MH 14 BA 6464) या मोटारीला लागलेली आग पाणी मारून पूर्णपणे विझवली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे पोलिसांनी सांगितले. या आगीत गणेश वायभट (२१) आणि योगेश वायभट (२३) हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांना पोलिसांनी  वायसीएम रुग्णालयात दाखल केले. आगीत मोटार पूर्णपणे जळून खाक झाली.

अग्नीशामक दलात भरत फाळके, रुपेश जाधव, सुनील फरांदे, गौतम इंगवले, बाळासाहेब वैद्य, लक्ष्मण व्होवाळे, सरोष फुंडे, अमोल चिपळूणकर यांनी विझविली.

Web Title: Shock Circuit causes motor car burns, two injured

टॅग्स