ते आले, दारू प्यायले अन् 'त्याच्या' डोक्यात दगड घालून पसार झाले!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

फैयाज हा त्याच्या ओळखीतील तीन मित्रासमवेत रविवारी सायंकाळी आंबेडकर शाळेच्या मैदानात दारू पिण्यास बसला होता.

पुणे : दारू पिण्यास बसल्यानंतर झालेल्या भांडणाच्या रागातून तिघांनी मिळून त्यांच्याच एका मित्राच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना येरवड्यात घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

- पुण्यात आत्महत्यांच्या घटना वाढताहेत; हॉटेल कामगाराने हॉटेलमध्येच घेतला गळफास

फैय्याज शेख (वय २७, रा.येरवडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैयाज हा त्याच्या ओळखीतील तीन मित्रासमवेत रविवारी सायंकाळी आंबेडकर शाळेच्या मैदानात दारू पिण्यास बसला होता. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून फैय्याजबरोबर वाद झाले. त्यानंतर तिघांनी मिळून फैयाजच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. या घटनेनंतर तिघेही तेथून पसार झाले. 

पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीच, आता तुम्हीच तुमचे रक्षक व्हा!

या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस घटनेच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन ससूनला पाठविला. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking incident held in Yerwada when three of them killed a friend by throwing a stone