पुण्यात आत्महत्यांच्या घटना वाढताहेत; हॉटेल कामगाराने हॉटेलमध्येच घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

सिनारे हे हॉटेलमध्येच झोपत होते. हॉटेलच्या मालकाने रविवारी सकाळी हॉटेल उघडले, तेव्हा...

पुणे : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.२८) सकाळी उघडकीस आली. ही घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. आर्थिक कारणातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

- म्हशीच्या दुधाला मिळाला ६२ रुपये एवढा उच्चांकी दर; कोणता दूधसंघ देतोय एवढा दर?

संजय भरत सिनारे (वय 32, रा.भारती विद्यापीठ पाठीमागील प्रवेशद्वार, वैष्णवी विहार सोसायटी, मूळ रा. कानड, राहुरी, नगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सिनारे हे चाकण येथे कामाला व त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्यास होते. मात्र लॉकडाऊनपूर्वी तेथून ते अचानक बेपत्ता झाला होते. याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी चाकण पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

- शेतकरीपुत्राच्या संशोधनाला मिळालं पेटंट; आता रस्ता अन् पर्यावरणही सुधारणार!

दरम्यान, सिनारे हे भारती विद्यापीठाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोरया मिसळ या हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी ते कामाला लागले होते. हॉटेल मालक काल संध्याकाळी काम संपवून गेले होते. सिनारे हे हॉटेलमध्येच झोपत होते. हॉटेलच्या मालकाने रविवारी सकाळी हॉटेल उघडले, तेव्हा सिनारे यांनी हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णलयात पाठवून दिला. तसेच त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला.

आणखी वाचा - पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीच, आता तुम्हीच तुमचे रक्षक व्हा!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotel worker commits suicide by hanging himself in a hotel at Bharati University campus