esakal | पुण्यातील धक्कादायक घटना; आईला मारहाण करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बोलून बातमी शोधा

Crime_molestation}

फिर्यादी महिला या त्यांच्या मुलीसोबत दुचाकीवरून घराकडे निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपी पारगेने त्याच्या कारमधून पाठलाग करत फिर्यादींना रस्त्यात अडविले.

पुण्यातील धक्कादायक घटना; आईला मारहाण करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कारमधून पाठलाग करीत दुचाकीसमोर कार आडवी लावत एका व्यक्तीने आईसमवेत निघालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतपाल रामचंद्र पारगे (रा. कोंढवा खुर्द) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंग आणि बालकांचे लैंगिक शोषण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना 27 फेब्रुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास जगताप चौक वानवडी परिसरात घडली. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे आरोपीने यापूर्वी देखील फिर्यादी महिलेवर अत्याचार केले असून त्याबाबत महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

पूजा चव्हाण प्रकरण : भाजप आणि लीगल जस्टीसचे दोन्ही खटले कोर्टाने फेटाळले​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या त्यांच्या मुलीसोबत दुचाकीवरून घराकडे निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपी पारगेने त्याच्या कारमधून पाठलाग करत फिर्यादींना रस्त्यात अडविले. त्यानंतर "तू काय माझे वाकडे केले गुन्हा दाखल करून" असे म्हणत फिर्यादींना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. झालेल्या प्रकारामुळे फिर्यादींचे मानसिक स्वास्थ ठीक नसल्याने त्यांनी 4 मार्च रोजी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)