
Baramati land dispute turns tragic: Uncle kills nephew, father-son duo taken into custody.
Sakal
काटेवाडी : बारामती तालुक्यातील पारवडी गावातील इंगळे वस्तीवर जागेच्या किरकोळ वादातून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या मालकीच्या जागेत बाथरूम बांधण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या भांडणात काका आणि त्याच्या मुलाने युवकाला जबर मारहाण केल्याने त्याचा जीव गेला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.