मनसे महिला शहराध्यक्षांचे ‘शोले स्टाइल’ आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या कार्यकर्त्या पाणी कपातविरोधात चिंचवडमध्ये रस्त्यावर उतरल्या. त्यावर कडी म्हणजे शहराध्यक्ष अश्‍विनी बांगर तब्बल दीड तास पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर बिथरलेल्या बांगर यांनी चक्क टाकीवरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

पिंपरी - महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या कार्यकर्त्या पाणी कपातविरोधात चिंचवडमध्ये रस्त्यावर उतरल्या. त्यावर कडी म्हणजे शहराध्यक्ष अश्‍विनी बांगर तब्बल दीड तास पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर बिथरलेल्या बांगर यांनी चक्क टाकीवरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

मनसेच्या उपविभागाध्यक्षा अनिता पांचाळ, संगीता देशमुख, स्नेहल बांगर, सुनीता गायकवाड, सुजाता काटे, अनिता नाईक, काजल खरात, सीमा परदेशी, श्रद्धा देशमुख, भाग्यश्री चिंचोळे आदींनी मोरया बसस्थानकाशेजारील पाण्याच्या टाकीजवळ सकाळी अकरा वाजता आंदोलन सुरुवात केली. ‘‘पाणी आमच्या हक्काचे..., बहिऱ्या प्रशासनाला जाग कशी येत नाही,’’ तसेच ’‘या आयुक्तांचे करायचे काय...’’, अशा घोषणा त्यांनी दिल्या. तोपर्यंत बांगर या पाण्याच्या टाकीवर चढून बसल्या, याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळताच ते आंदोलनस्थळी पोचले. फौजदार नंदकुमार कदम यांनी महिला पोलिसांच्या मदतीने बांगर यांना टाकीवरून खाली उतरण्यास सांगितले. पण जोवर आयुक्त व पाणीपुरवठा अधिकारी आंदोलनस्थळी येत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ते पाहून महिलांना सोडा, अन्यथा मी खाली उडी मारेन असे सांगत बांगर यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यांना टाकीवर खाली उतरून आणले.

कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हे आमच्यासाठी शरद पवारच : जयंत पाटील

याबाबत पाचाळ म्हणाल्या, ‘‘पवना धरणामध्ये शहराला पुरेल एवढा मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्ताधारी व टॅंकर माफियांच्या संगनमताने नागरिकांना वेठीस धरले जात आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shole style agitation by mns women city president for water supply