पुणे विद्यापीठात कॅमेरा रोल अॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगची लगबग

ब्रिजमोहन पाटील
Wednesday, 28 October 2020

चित्रपटाच्या शूटिंगसाठी लावलेले कॅमेरे, अभिनयाचा सराव, त्यासाठी कलाकारांना देण्यात  येणाऱ्या सूचना अन सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त असे चित्र परिसरात होते. अभिनेता अर्जून रामपाल यांच्या उपस्थितीत ही शुटींग सुरू झाली आहे. 

पुणे - "कोरोना'मुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर शांत झालेला असताना आज सकाळपासून मात्र मुख्य इमारतीच्या परिसरात गडबड सुरू झाली आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी लावलेले कॅमेरे, अभिनयाचा सराव, त्यासाठी कलाकारांना देण्यात  येणाऱ्या सूचना अन सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त असे चित्र परिसरात होते. अभिनेता अर्जून रामपाल यांच्या उपस्थितीत ही शुटींग सुरू झाली आहे. 

"नेल पॉलिश' या चित्रपटाचे शूटिंग बुधवारी सकाळपासून मुख्य इमारतीच्या परिसरात ज्ञानेश्वर हाॅलच्या जवळ सुरू झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका दिवसाची परवानगी विद्यापीठ प्रशासनाने दिलेली आहे. आज सकाळपासून मुख्य इमारतीच्या परिसरात शूटींगच्या तयारीची गडबड सुरू होती. सेट तयार करणे,  कॅमेऱ्याची  अरेंजमेंट यासह इतर तांत्रिक कामे चित्रपटाच्या टीम कडून केली जात होती. सकाळी १०च्या सुमारास अर्जुन रामपाल येथे आल्यानंतर त्यांनीही शुटींगची माहिती घेतली. पुढील काही तास ही शुटींग चालणार आहे. या परिसरात गर्दी होऊ नये यासाठी बंदोबस्तही तैनात केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, यापूर्वी ही पुणे विद्यापीठाच्या आवारात अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे, त्यासाठी सेटही उभारण्यात आले होते. कोरोना लॉकडाऊननंतर आता पहिल्यांदाच  विद्यापीठात चित्रपटाचे शूटिंग होत आहे. यासाठी  प्रतितास २५ हजार रुपये भाडे आकारले जाणार आहे. तर ५ लाख रुपये अनामत रक्कम स्वीकारण्यात आली आहे. 

विद्यापीठात शूटिंग होत असताना बॉलिवूडमधील स्टारकास्ट या ठिकाणी येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करून हे शूटिंग करावे लागणार आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन होत आहे की नाही हे पाहण्याचे आव्हान जिल्हा प्रशासन व पोलिसांपुढे आहे, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shooting of the film Nail Polish at Savitiribai phule Pune University