उगवत्या प्रतिभांना गवसला ‘सिनेमास्कोप’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

पुणे - 'सिनेमास्कोप’ संस्थेने आयोजित केलेल्या यंदाच्या लघुपट स्पर्धेतील अंतिम फेरीत दाखल झालेल्या लघुपटांचा महोत्सव शुक्रवारी (ता. २४) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रभात रस्त्यावरील प्रेक्षागृहात होतो आहे. पुरस्कारांच्या शर्यतीत असलेल्या १२ वैविध्यपूर्ण लघुपटातून अंतिम विजेत्यांची निवड प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी व अभिनेता संदीप कुलकर्णी करणार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी व उमेश कुलकर्णी यांना ‘प्राईड ऑफ पुणे’ या विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार आहे, असे संस्थेचे कार्यकारी संचालक संजय सिरिया व डॉ. प्रतिभा सिरिया यांनी सांगितले.

पुणे - 'सिनेमास्कोप’ संस्थेने आयोजित केलेल्या यंदाच्या लघुपट स्पर्धेतील अंतिम फेरीत दाखल झालेल्या लघुपटांचा महोत्सव शुक्रवारी (ता. २४) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रभात रस्त्यावरील प्रेक्षागृहात होतो आहे. पुरस्कारांच्या शर्यतीत असलेल्या १२ वैविध्यपूर्ण लघुपटातून अंतिम विजेत्यांची निवड प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी व अभिनेता संदीप कुलकर्णी करणार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी व उमेश कुलकर्णी यांना ‘प्राईड ऑफ पुणे’ या विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार आहे, असे संस्थेचे कार्यकारी संचालक संजय सिरिया व डॉ. प्रतिभा सिरिया यांनी सांगितले. ‘सकाळ’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहे. 

या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता उद्‌घाटन सोहळ्याने महोत्सवास प्रारंभ होईल. ‘फिल्म इन्स्टिट्यूट’चे संचालक भुपेन कॅन्थोला व ‘फिल्म अर्काईव्हज’चे प्रमुख प्रकाश मगदूम यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या समारंभानंतर महोत्सवातील १२ लघुपट दाखविले जातील. दुपारी साडेतीन वाजता महोत्सवाचा समारोप सोहळा होईल. हा कार्यक्रम ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’ पद्धतीने सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. 

देश-विदेशातूनही लघुपट स्पर्धेसाठी दाखल झाल्याची माहिती महोत्सवाचे क्रिएटिव्ह डायरेक्‍टर प्रशांत पाटील यांनी दिली. छायादिग्दर्शक बंटी देशपांडे व वेशभूषाकार दीपाली देशपांडे यांचीही मदत प्राथमिक फेरीतील निवडीसाठी झाली. नवोदित लेखक, दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी प्रतिष्ठित मंच निर्माण करणे व या नवोदितांमध्ये विचारांचे आदानप्रदान घडणे हा हेतू आयोजनामध्ये असून ‘सिनेमास्कोप’च्या वतीने या मंडळींसाठी पुढे मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Web Title: short films mahotsav