बाजारातही मीटरचा तुटवडा, ग्राहकांना येथेही वाट पाहवी लागणार 

a shortage of Electricity meters in the market
a shortage of Electricity meters in the market
Updated on

पुणे : उपलब्ध नसल्यामुळे थ्री फेज मीटर खुल्या बाजारातून खरेदी करण्यास महावितरणने वीज ग्राहकांना परवानगी दिली खरी, परंतु बाजारात देखील या मीटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. त्यामुळे वाट पाहण्या पलिकडे ग्राहकांना आता पर्याय राहिलेला नाही. 

रेडीओ फ्रिक्वेन्सी असलेलीथ्री फेजच्या मीटरचा महावितरणकडे तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पैसे भरूनही वीज ग्राहकांना मीटर उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. त्यावर पर्याय म्हणून ग्राहकांनी बाजारातून हे मीटर खरेदी करावेत. त्यांची मोफत तपासणी करून देण्याबरोबरच मीटरसाठी मोजलेले पैसे वीजबिलातून वळती करून देण्याची सुविधा महाविरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत बाजारात या मीटरचा आढावा घेतल्यानंतर तेथेही तुटवडा निर्माण असल्याचे दिसून आले आहे. 

लातूरकडे धान्य घेऊन निघालेल्या ट्रक चालकाचा अज्ञाताकडून खून  

बाजारात सुमारे साडेतीन ते चार हजार रूपयांना मिळते. परंतु गेल्या महिन्यापासून अचानक या मीटरला मागणी वाढली आहे. शहरात सध्याच्या घडीला दोन हजाराहून अधिक मीटरची गरज आहे. हे महाविकरणकडे प्रलंबित असलेल्या अर्जावरून समोर आले आहे. खुल्या बाजारातही हे मीटर उपलब्ध होण्यास आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालवधी लागू शकतो, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे वीजग्राहकांच्या हातात सध्या तरी वाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याचे समोर आले आहे. 

''महावितरणने खुल्या बाजारातून आरएफ थ्रीफेज मीटर खरेदी करण्यास गेल्या महिन्यापासून परवानगी दिली. यापूर्वी अशी परवानगी नव्हती. मागणी वाढल्याने ही मीटर उपलब्ध नाही. ती उपलब्ध होण्यास आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालवधी लागणार आहे. ''
- विशाल जोजारे ( मीटर विक्रेते, येरवडा) 

''महावितरणकडे उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. खुल्या बाजारात देखील तुटवडा निर्माण झाला आहे. ही परिस्थीती आणखी एक महिना राहिल.''
- दिपक चव्हाण (मीटर विक्रेते, शनिवार पेठ) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com